

प्रसंगांनुरूप ग्रीटींग्ज, त्यात सतत नवनवीन डिझाईन्सचे अपडेट्स
आपल्या सोबत कायम असणाऱ्या आपल्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक खास प्रसंगांना आपली सोबत असुद्या काव्यमय शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून. वाढदिवस असो वा लग्न, आभार व्यक्त करणे असो वा सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा. व्यक्त करायचे असो प्रेम अथवा मैत्री. करा मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त.
सण - मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक. गणेशाचा जयजयकार असो वा दिव्यांची सजावट, होळीचे रंग असोत वा मंगळागौरीची गाणी. द्या शुभेच्छा आपल्या प्रियजनांना शुभेच्छापत्रे पाठवून. आपल्या शुभेच्छा करतील त्यांचा आनंद द्विगुणित.
सुंदर सकाळ घेऊन येते नवीन आशा. आध्यात्मिक शुभेच्छांनी करा दिवसाची सुंदर सुरुवात. देवाचे नामस्मरण, करी सकाळ प्रसन्न.
प्रत्येक दिवसाचे असते एक महत्व, मग तो कारगिल दिवस असो वा संविधान दिवस, साजरा करा प्रत्येक दिवस एक नवीन शुभेच्छापत्राने. दरदिवशी पाठवा शुभेच्छापत्रे त्या दिवसाचे महत्व कथन करणारी.
ग्रीटींगचे अनेक प्रकार तयार करा फक्त प्रासादिक मध्ये
निवडा मनाजोगतं डिझाईन आणि बनवा आपलं प्रत्येक शुभेच्छापत्र एकदम खास ज्यात असेल प्रत्येक गोष्ट आपण निवडलेली मग ते शुभेच्छापत्राचे डिझाईन असो वा त्यावरील संदेश
शुभेच्छापत्र म्हणजे फक्त त्यातील डिझाईन वा संदेश नव्हे तर त्यात तुम्ही लिहू शकता ज्याला पाठवता आहेत त्याचं व आपलं नाव
प्रासादिक मध्ये आहे अप्रतिम शुभेच्छासंदेशांचा खजिना. आपल्या भावनांना साजेश्या शुभेच्छा निवडा आणि आपल्या आवडत्या डिझाईन बरोबर पाठवा
प्रासादिक मधील अप्रतिम संदेशांसोबतच आपला स्वतःचा सुद्धा संदेश शुभेच्छापत्रात लिहा आणि तुमच्या भावना अधिक मोकळेपणाने व्यक्त करा
मनाजोगतं डिझाईन, आवडता शुभेच्छासंदेश आणि सोबत ब्रशने ड्रॉ करा आणि वाढवा शुभेच्छापत्राचे सौंदर्य
प्रसंगानुरूप डिझाईनचे नियमित अपडेट्स
नजीकच्या काळात येणाऱ्या सणांची व विशेष दिवसांची शुभेच्छापत्रे यांचे अपडेट्स मिळवा मोफत
नवीन शुभेच्छापत्रांचे अपडेट्स आल्यास त्याचे नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलवर मिळवा
प्रत्येक दिवसानुसार नवीन डिझाइन्सचे अपडेट्स पहा आणि आवडती शुभेच्छापत्रे डाउनलोड करा